आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे जिल्हाभर आंदोलन

  • आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे जिल्हाभर आंदोलन

सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा सरकारने करावा
ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे जिल्हाभर आंदोलन ; आमदार सावरकर अग्रवाल यांची घोषणा

अकोला

ओबीसी समाजाचा विश्वासघात  करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी जिल्हा भर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर   महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर अध्यक्ष विजय अग्रवालयांनी केली.

अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत.  इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे.विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या15 सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही. अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर भाजपा अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी नमूद केले.

यावेळी तेजराव थोरात माधव मानकर रमेश आप्पा खोबरे केशव ताथोड अक्षय गंगाखेडकर संजय जिरापुरे डॉक्टर विनोद बोर्डे संजय गोडफोडे संजय गोडा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवी गावंडे व महानगराध्यक्ष जयंत मसने महापौर अर्चना ताई मसने सभापती संजय बडोणे योगिताताई पावसाळे राहुल देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष सचिन देशमुख उमेश गुजर श्रीकृष्ण मोरखडे दिलीप सांगळे रामेश्वर वानखडे गणेश कडारकर श्रावण इंगळे अमोल साबळे गजानन उंबरकार जयश्री फुंडकर मोनिकाताई गावंडे मायाताई कावरे हरिनारायण माकोडे भूषण कोकाटे राजू काकड रमण जैनअशोक गावंडे करकोटक एडवोकेट देवाशिष काकडे संतोष पांडे गणेश अंधारे निलेश निनो रे अमोल गोगे राजेंद्र गिरी वैशाली शेळके गीतांजली शेगोकार महेंद्र पेजावार भूषण भाऊ कोकाटे रितेश गुप्ता अभिजीत गहिलोत आदी  गजानन बलक विठ्ठल वाघ अंकित पंच पुते राहुल झापर्डे सागर  बारोळे रामदास नवघरे मनोज पारस्कर आकाश हजारे आनंद पुडे ज्ञानेश्वर शेंडे अभिलाष मोरे लखन राजनकर भिकाजी धोत्रे ज्ञानेश्वर पोटे आदी यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!