हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना : सोमय्या

हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, फडणवीस आणि चंद्रकांत दादांनी दिलीय सूचना : सोमय्या

सातारा : भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप केला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत, ‘हसन मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा काय संबंध? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही, तर मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अशी सूचना आपल्याला खुद्द देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते कराड पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून रोखल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!