परिवहन मंत्री अनिल परब यांचा सोमय्यांविरोधात अखेर 100 कोटींचा दावा दाखल

परिवहन मंत्री अनिल परब यांचा सोमय्यांविरोधात अखेर 100 कोटींचा दावा दाखल

मुंबई : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. आपल्यावरील आरोप मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा 100 कोटींचा दावा दाखल करू, अशी नोटीस अनिल परब यांनी सोमय्यांना पाठवली होती. मात्र, 72 तासानंतरही सोमय्यांनी माफी न मागितल्याने अखेर हा दावा दाखल करण्यात आला आहे.

अनिल परब यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे, असं परब यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे

This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!