आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाला ‘भ्रष्टाचारी‘ महाविकास आघाडी सरकारच अशी टीका आमदार रणधीर सावरकर यांनी केलीय !

अकोला राजकीय

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाला ‘भ्रष्टाचारी‘ महाविकास आघाडी सरकारच जबाबदार; काळ्या यादीतील कंपनीला कोणी काम दिले याची सीआयडी मार्फत चौकशी करा भाजपा

प्रतिनिधी

अकोला : आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करून साडेआठ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थांना वेठीस धरण्याचे महापाप या महाविकास आघाडी सरकारने केले असून, टक्केवारीच्या मोहापायी बोगस कंपनीला कामे द्यायची आणि त्यातून हे असले गोंधळ घालायचे हाच महाविकास आघाड सरकारचा ‘भ्रष्टाचारी पॅटर्न’ बनला असून आरोग्य विभागाच्या परीक्षेतील या गोंधळाला महाविकास आघाडी सरकार हेच जबाबदार असल्याची टीका भाजपा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात महापौर अर्चनाताई मसने अध्यक्ष सचिन देशमुख उमेश गुजर यांनी केली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा दोन महिन्यात भरणार अशी वल्गना करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या आरोग्य खाते व आघाडी सरकार यांनी सहा महिने उलटून गेल्यानंतर आज केवळ क व ड वर्गाच्या ६१९१ पदांसाठी परीक्षा घोषित केली होती. परंतु देशातील ६ राज्यांमध्ये काळ्या यादीत असलेल्या व अनेक गुन्हे नोंद असलेल्या न्यासा या कंपनीला महाराष्ट्रातील परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले. यापूर्वी अनेक राज्यात या न्यासा कंपनीने परीक्षांमध्ये गोंधळ घातला असून या कंपनीला काम का देण्यात आले असा प्रश्न सुद्धा भाजप आमदारांनी उपस्थित केला होता , परंतु राज्य सरकारने त्याकडे कानाडोळा गेला. या परीक्षेबाबत विद्यार्थ्यामध्ये प्रचंड गोंधळ असून परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही, अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नव्हते तसेच उत्तर प्रदेश व इतर प्रांतात परीक्षा केंद्र नावे देण्यात आली सध्या covid-19 ची परिस्थिती बेरोजगारांची स्थिती ग्रामीण भागातील अतिवृष्टीमुळे झालेली परिस्थिती लक्षात घेता जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर परीक्षा घेण्यासाठी गरज असताना सरकारने हा निर्णय घेतला युवकांच्या भावनेच्या अपमान केला असाही आरोप भाजपाने केला आहे

हे ही वाचा – मुंडगाव प्रा.आ.केंद्र येथील कर्मचारी निवासस्थानाची दुरुस्ती निकृष्ट दर्ज्याची ! 

परीक्षा साठी जाणारे विद्यार्थी रेल्वेस्थानकावर तिकिटे काढली अनेक प्रकारची कर्ज काढून विद्यार्थी परीक्षा केंद्रासाठी आले त्याचे फोटो सुद्धा वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे परंतु शासन याबाबत दखल घेत नाही विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यांची माफी मागावी, प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची असे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले होते यासंदर्भात भाजप नेत्यांनी राज्य सरकारला दिली होती परंतु त्याकडे सुद्धा कानाडोळा करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. त्यामुळे परीक्षेला अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, परीक्षा नक्की कधी घेणार याची 48 तासांच्या माहिती द्यावी व काळ्या यादीतील कंपनीला कोणी काम दिले याची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी आग्रही मागणी सुद्धा आमदार रणधीर सावरकरआमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने तेजराव थोरात सचिन देशमुख उमेश गुजर यांनी केले.

हे ही वाचा – Osmanabad : आकाशातून तांबड्या रंगाचा दगड जमिनीवर, उस्मानाबादच्या वाशीमध्ये उल्कापात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *