जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी भाजपचे स्टार प्रचारक मैदानात

अकोला

 जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजपच्या स्टार प्रचारक वतीने प्रचार सुरू

अकोला टाईम  ब्युरो नेटवर्क 

 

दिनांक:- 30 सप्टेंबर 2021

अकोला: अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपाचे स्टार प्रचारक भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मैदानात उतरले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेले कामे, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, यांनी केलेले कामे व राज्य सरकारचे अपयश, जिल्हा परिषद मधील भारिप-बहुजन महासंघाचा भोंगळ कारभार याविषयी जनतेशी संवाद साधून सध्याची परिस्थिती राज्य शासनाचे अन्यायकारी निर्णय याचा पाढा वाचून भाजपा उमेदवार सक्षम जनतेला न्याय मिळवून देणार पक्ष असून जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक मध्ये भाजप उमेदवारांना विजयी करा. असा मताचा जोगवा मागत आहे.

आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, तेजराव थोरात, अनुप धोत्रे, मनोहर राहणे, शिवाजीराव देशमुख हीरा सिंह राठौड़, मनीराम ताले, महापौर अर्चनाताई मसने, रामदास तायडे, वामन भिसे, प्रभाकर मानकर, विजय सिंग सोळंके उमेश पवार, अमोल सिंग भोसले, शीलाताई खेडकर, स्मिताताई राजनकर, सुमन ताई गावंडे, गितांजलीताई शेगोकार, वैशालीताई शेळके, कुसुमताई भगत, भाजयुमो जिल्हाध्यक्ष नगरसेवक सचिन देशमुख, पोहनकर, तालुका अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी विविध आघाडीचे पदाधिकारी, बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख, बुथ समिती सदस्य भाजपा उमेदवारासाठी प्रचार करीत आहे.

 सर्वसामान्य व समाजाशी निगडीत अभ्यासू उमेदवार पक्षाने देऊ सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात सातत्याने कोविड-19 मध्ये केलेले कामे याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा काम भाजपचे स्टार प्रचारक सरळ आणि सोप्या भाषेत जनतेशी संवाद साधून भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहे.

अतिवृष्टी होऊन शेतीचे सर्वे न होणे भेदभाव नीती कृषी विमा विभागाची मदत न मिळणे. हे मुद्दे जनते समोर मांडून ओबीसी आरक्षण व मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकारचे अपयश, मंदिरे शाळा सुरू करतांना टाकलेल्या अटी संदर्भात सुद्धा प्रचाराचा मुद्दा भाजपाच्यावतीने जनतेसमोर मांडून सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या अनैसर्गिक आघाडी करणाऱ्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी केवळ भाजपा द्वेषाने मोदी कडे प्रत्येक बाबी संदर्भात बोट दाखवून आपण काहीच करत नाही. सिद्ध करत असल्याचा आरोप सुद्धा भाजपचे स्टार प्रचारक आपल्या प्रचारात करत आहे.

  • भाजपाच्या प्रचार व जनतेमध्ये महाविकासआघाडी संदर्भात असलेला असंतोष मतपेटीद्वारे व्यक्त होऊन 7 ऑक्टोंबर ला मतमोजणीच्या वेळी भाजपा उमेदवार विजयी होणार असा दावा भाजपा प्रचार प्रमुख गिरीश जोशी यांनी केला आहे..

हे हि वाचा..

जुने शहर पोलिसांनी वाचविले महिलेचे प्राण..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *