ग्रामरोजगार सेवकांना कायम करा; अकोला जिल्हा शाखेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…!

अकोला

ग्रामरोजगार सेवकांना कायम करा; अकोला जिल्हा शाखेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…!

 

2 ऑक्टोंबर ला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

 

प्रतिनिधी: योगेश शिरसाट

दिनांक: 1 ऑक्टोंबर 2021

 

अकोला: अकोला जिल्हा ग्राम रोजगार सेवक संघटना जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत निवेदन देऊन ग्राम रोजगार सेवक यांना कायम सेवेत समाविष्ट करा असे निवेदन देण्यात आले.

हे ही वाचा –टू व्हीलर बॅटरी चार्जिंग ची गाडी किती धोकादायक आहे बघा;बॅटरी च्या गाडीला अचानक आग..

ग्राम रोजगार सेवक मागील 14 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये तुटपुंजा मानधनावर सेवा देत आहेत ग्रामपंचायत मध्ये नवीन ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यावर सर्वप्रथम ग्राम रोजगार सेवक यांना राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये सूडबुद्धीने हेतूपुरस्पर कामावरून कमी करून अन्याय होत आहे, काही ग्राम रोजगार सेवक यांनी या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या सुद्धा केलेले आहेत त्यामुळे ग्राम रोजगार सेवकांची सेवा मागील 14 वर्षापासून राज्य सरकारच्या मार्फत ग्रामपंचायतीला देण्यात येत आहे आणि कुटुंबाचे पालन पोषण  ही कुटुंब प्रमुख म्हणून रोजगार सेवक या पदावर  अवलंबून असून कुटुंबावर उपासमारीची पाळी येत आहे.

   करिता महोदय ग्रामरोजगार सेवकांना सेवेत कायम करून न्याय देण्यात यावा अन्यथा 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी राज्यभरातून एक दिवशीय लक्षनिय उपोषण करण्यात येईल असे राज्यभरात जिल्हा स्तरावर निवेदन देऊन अकोला जिल्हा ग्राम रोजगार सेवक संघटना शाखेच्यावतीने सुद्धा जिल्हा अधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर अकोला जिल्हाा अध्यक्ष नरेंद्र सदांशिव, उपाध्यक्ष देवगन इंगळे, कार्याध्यक्ष अंबादास वाहुरवाघ, अकोला तालुका अध्यक्ष किशोर तेलगोटे , पुरुषोत्तम कराळे, सतीश गावंडे, संघपाल गवई, इंगळे, सचिन खंडारे, धनराज शेगावकर, राजेश इंगोले या ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सह्या निवेदनावर असून एक दिवसीय लक्षणीय धरणे उपोषणाला अकोला जिल्हाभरातून पदाधिकारी बसणार आहेत.

हे हि वाचा…टू व्हीलर बॅटरी चार्जिंग ची गाडी किती धोकादायक आहे बघा;बॅटरी च्या गाडीला अचानक आग..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *