उद्या पासून शाळा सुरू होणार; परंतु विद्यार्थ्यांचे लक्ष लागणार का..?

शैक्षणिक

 

 

.

उद्या पासून शाळा सुरू होणार; परंतु विद्यार्थ्यांचे लक्ष लागणार का..?

प्रतिनिधी: योगेश शिरसाट

दिनांक: 3/10/2021

अकोला: कोरोना महामारी मुळे जगभरात थैमान घातले होते कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये म्हणून मागील दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती त्याचाच मोठा परिणाम शिक्षणावर सुद्धा झालेला दिसून येत आहे शासनाने ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी याचा ग्रामीण भागात उपयोग झालाच नाही.

त्यामुळे विद्यार्थी मात्र अभ्यासापासून कोसो दूर गेलेले काही ठिकाणी दिसून येत आहे या कारणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्या विषयी पालक वर्गांना चिंता व्यक्त होत असून उद्या 4 ऑक्टोंबर सोमवार पासून शासनाच्या आदेशानुसार शाळा पुन्हा सुरू होणार आहेत शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना मात्र शाळेचा विसर पडल्याचे व अभ्यासात कमी मन लागण्याचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे विद्यार्थ्यांसाठी “कभी खुशी कभी गम” असे दिसून येत असले तरी शासनाच्या आदेशानुसार “स्कूल जायेंगे हम” असे चित्र निर्माण झाले आहे .

मागील दोन वर्षापासून   कोविड-१९ महामारी मुळे शाळा जरी बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चालू होते परंतु आता विद्यार्थ्यांचे उद्या चालू होणाऱ्या शाळेत लक्ष लागतील काय.? आणि ऑनलाइन शिक्षणाचा  कितपत विद्यार्थ्यांना यातील ज्ञान आले हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला या प्रश्नांमुळे उद्या शाळा जरी चालू होत असल्या तरी पण ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या पालकांना चिंता होत असल्याचे दिसून येते.

हे हि वाचा..भारतीय बौध्द महासभा शाखा गुडधी ची कार्यकारीणी गठीत;जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *