अकोला : महिलेनं चिमुकल्यासह विहरित उडी घेऊन केली आत्महत्या

अकोला ग्रामीण

 

  • अकोला : महिलेनं चिमुकल्यासह विहरित उडी घेऊन केली आत्महत्या

अकोला : ता.पातूर येथील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांगेफळ येथील रहिवाशी विवाहित महिलेन आपल्या चिमुकल्या मुलांसह आपली जीवनयात्रा संपवलल्याची घटना घडलीय मृतक महिलेने चांगेफळ शेतशिवारातील विहिरीत आपल्या मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण चांगेफळ सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पूजा गजानन काळे २८, मुलगी तनु गजानन काळे ८ , व आठ महिन्याचा लहान मुलगा स्वामी गजानन काळे असे तिघा मृतकाचे नाव आहे.

सोमवारी दुपारी दळण आणायला जातो असे सांगून आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मृतक महिला गेली असल्याचे सांगण्यात आलेय, मात्र सायंकाळ होई पर्यंत ती महिला घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेणे सुरू केले असता शेतशिवारातील विहरित त्या तिघांचे प्रेत तरंगत दिसून आल्याने नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यामुळे चांगेफळ सह परिसरात सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरलंय.

हे ही वाचा – जुने शहरातील जय हिंद चौक मध्ये तुफान गर्दी

या घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश नावकार, सहाय्यक उपनिरीक्षक बाळकृष्ण येवले आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करून तिघांचे मृतदेह अकोला सर्वोपचार रुग्णालयाला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून, पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशन करीत आहे.

जुने शहरातील जय हिंद चौक मध्ये तुफान गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *