1 मे महाराष्ट्र दिनी अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करा अन्यथा छेडण्यात येईल तीव्र आंदोलन

IMG 20210424 WA0035

अकोला : दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना ने महा. मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडन्याचा इशाराही दिला आहे.

            संपूर्ण देश कोरोना महामारी च्या संकटाला तोंड देत असतांना डॉक्टर आणि रुग्णालये अतिशय मोलाची भूमिका पार पाडत आहेत,आमच्या अकोला जिल्ह्यात सुद्धा कोरोना ने कहर केला असून असंख्य रुग्ण दगावत आहेत अकोला जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची वाढत चाललेली रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे त्यात शासकीय आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहेत,रुग्ण खाजगी रुग्णांचा आधार घेत आहेत परंतु त्या ठिकाणी रुग्णांची लूट होत असून अनेक रुग्ण पैसे नाहीत म्हणून उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत,नुकताच एक रुग्ण आयकॉन हॉस्पिटल प्रशासनाने भरती करून न घेतल्याने त्याचा अंबुलन्स मध्येच जीव गेला आहे,असे सर्व माणुसकीला काळिमा फासण्याचे प्रकार अकोल्यात राजरोसपणे सुरू आहेत,अकोला जिल्ह्याला वैद्यकीय उपचारासाठी मैलाचा दगड ठरावा अस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अनेक दिवसांपासून बांधून तयार आहे,या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली आहे परंतु अद्यापही हे हॉस्पिटल सुरू न करण्यात आल्याने आम्हा अकोलेकराणा अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे,हे रुग्णालय सुरू करावे यासाठी अनेक सामाजिक संघटना आणि लोक प्रतिनिधी मागणी करत असताना सुद्धा रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रशासन का दिरंगाई करत आहे हा चिंतेचा विषय आहे,

       कोरोना सारख्या महामारीत हे रुग्णालय सुरू होत नसेल तर काय कामाचे असे भावोद्गार अकोले करांच्या तोंडून बाहेर पडत असून संताप व्यक्त केला जात आहे,जनभावनेचा आदर करून अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी तरी जनतेच्या सेवेत रुजू करावे अशी मागणी आम्ही करत आहोत.येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी जर रुग्णालय सुरू झाले नाही तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल. करिता अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी सुरू करण्यासंदर्भात आदेश व्हावेत अशी नम्र विनंती संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर,व जिल्हाध्यक्ष आशिष सावळे अकोला यांनी केले आहे.

अकोला विभाग ‘हिवताप मुक्त’ करण्याचा संकल्प  2022 पर्यंत हिवताप दूरीकरणाचे

लक्ष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100