केंद्र सुरू होण्यासाठी हालचालींना वेग, ऑक्सिजनसाठी प्रयत्न

केंद्र सुरू होण्यासाठी हालचालींना वेग, ऑक्सिजनसाठी प्रयत्न

अकोला : अकोला जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता जि. प.कडून कर्मचारी भवनातील कोविड आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार सुरु व्हावेत, यासाठी जिल्हा परिषदकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. रविवारी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केंद्राची पाहणी केली. ऑक्सिजनसह अन्य बाबींच्या पूर्ततेसाठी प्रशासन व सत्ताधार्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्यापासून केंद्रात रुग्णांवर उपचार सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोपचार रूग्णालयात खाटा नसल्याने हे केंद्र रुग्णांसाठी नवसंजीवनी देणारे ठरणार आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून, शासकीय व खासगी रूग्णालयांत काहीच खाटा शिल्लक आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत असल्याने २२ एप्रिललाजिल्हा परिषद कर्मचारी भवनातील समर्पित कोविड आरोग्य केंद्राचे उदघाटन केले. येथे राष्ट्रीय आरोग्य मशिन व जिल्हा वार्षिक योजनेतून मिळलेल्या निधीतून खाटांसह अन्य साहित्य खरेदी केले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे कोविड आरोग्य केंद्र येथे सज्ज झाले असून, तूर्तास सर्वोपचार रूग्णालयातून रेफर झालेल्या रुग्णांवर सेंटरमध्ये उपचार करणार आहे. यात प्रामुख्याने ९० ते ९५ दरम्यान ऑक्सिजनची पातळी असलेल्या रुग्णांचा समावेश राहणार आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या कोविड आरोग्य केंद्रात अशी आहे सज्जता पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून..
कोविड आरोग्य केंद्रात अशी आहे सज्जता
१) ऑक्सिजन – कोविड आरोग्य केंद्रात सध्या १५ ऑक्सिजन सिलिंडर असून, सोमवारी आणखी २५ मिळणार आहे. ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी ३० काॅन्संट्रेटर यंत्रेही आहे.
२) खाटा – सेंटरमध्ये सध्या ५६ खाटा सज्ज असून, ही संख्या दोन-तीन दिवसात ६० पर्यंत वाढवणार.
३) कुलर – उन्हाळा लक्षात घेता केंद्रात सध्या १० मोठ्या कुलरर्सची व्यवस्था करण्यात आली असून, पंखेही आहे.
४) शुद्ध पाणी – रूग्णांना पीण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी सध्या एका वाॅटर कुलरचीही व्यवस्था करण्यात आली.
५) आरोग्य चमू – सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमधील एकूण २४ डाॅक्टर व २३ परिचारिकांची नियुक्ती सेंटरमध्ये राहणार. त्यांचे प्रशिक्षण सर्वोपचार रुग्णालयात प्रशिक्षण झाले.

औषधी ऑक्सिजन सीमाशुल्क व जीएसटी माफ ना.धोत्रे यांनी मानले आभार

रक्तदान व प्लाजा दान करण्यासाठी सुद्धा पुढे यावे ; केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
WhatsApp5k
100