सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत (Best Ganeshotsav Competition)शहरातील अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे – मनपा प्रशासन.
अकोला : – सांस्कृतिक कार्य विभागातर्फे, सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. शहरातील सर्व मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा.(Best Ganeshotsav Competition)
गणेशोत्सवास दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 प्राप्त शिफारशींमध्ये गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची (Best Ganeshotsav Competition) निवड केली जाणार आहे. तर उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना सहभागी होता येईल.
हे वाचले का -धम्म तत्वज्ञान स्पर्धा परीक्षा
गुणांकनात गायन, वादन, नृत्य, नाट्य, लोककला, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, माहितीपट/चित्रपट आदींसाठी प्रत्येकी 2 नुसार एकूण 20 गुण आहेत. संस्कृतीचे जतन अंतर्गत संस्कृती संवर्धन, पारंपरिक भांडी, नाणी, शस्त्र आदी प्रदर्शन, वाङमयीन उपक्रम, लुप्त होणा-या कलाविष्कारांचे संवर्धन आदींसाठी प्रत्येकी 2 असे एकूण 10 गुण आहेत. राज्यातील गडकिल्ले, तसेच राष्ट्रीय, राज्य स्मारक यांच्या जतन, संवर्धनासाठी प्रत्येकी 5 नुसार एकूण 10 गुण आहेत. सामाजिक उपक्रमात महिला उपक्रम, पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, व्यसनमुक्ती, ज्येष्ठ नागरिक उपक्रम, शैक्षणिक, कृषी उपक्रम, वंचित घटकांसाठी उपक्रम आदींसाठी प्रत्येकी 2 याप्रमाणे 25 गुण आहेत. त्यात आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृध्दाश्रम, एखादे गाव दत्तक घेणे अशा प्रकारचे कायमस्वरूपी उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना 5 गुणांचा समावेश आहे. पर्यावरणपूरक मूर्तीसाठी 5 व पर्यावरणपूरक सजावटीला 5 गुण आहेत. ध्वनी प्रदूषणरहित वातावरण असल्यास 5 गुण व पारंपरिक किंवा देशी खेळांच्या स्पर्धेसाठी 10 गुण आहेत. गणेश भक्तांसाठी पेयजल, प्रसाधनगृह, प्रथमोपचार, वाहतूकीत अडथळा येणार नाही असे आयोजन, स्वच्छता यासाठी प्रत्येकी 2 असे एकूण 10 गुण आहेत.
शासनाच्या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि. 31 जुलैच्या शासन निर्णयाच्या सोबत स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेतसहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या Mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि. 31 ऑगस्ट, 2024 या कालावधीत अर्ज सादर करावा.