नेहरू पार्क येथे निशुल्क योग शिबीराचे आयोजन
स्थानिक नेहरू पार्क अकोला येथे नेहरू पार्कचे संचालक बी एस देशमुख यांनी निशुल्क योग शिबीराचे आयोजन आज दि.५ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २४ पर्यंत सकाळी ५.४५ ते ७.३० या वेळेत आयोजीत केले आहे.
शिबीरात शिवतेज प्रतिष्ठानचे योगगुरू मनोहर इंगळे हे योग, ॲक्यप्रेशर व औषधोपचार यावर मार्गदर्शन करून तसेच सुदर्शन क्रिया ही नाथांच्या ध्यान पध्दतीवर वेगवेगळ्या प्रकारे सराव करून घेतील त्याचबरोबर शिवपूराणवर माहिती देतील.
अनुराधा इंगळे ह्या योगनृत्यावर सराव करून घेतील महिलांची व्यवस्था वेगळी राहील.
सदर शिबिराचा लाभ गरजवंतांनी घ्यावा असे शिवतेज प्रतिष्ठानचे रामप्रकाश मिश्रा,जसवंतसिंग मल्ली,ॲड.वामन चौधरी,पुरुषोत्तम गुप्ता, बाळासाहेब काळे, अशोक बियाणी,मुकेश खंडेलवाल,शिवतेज इंगळे,अनुराधा इंगळे, विनोद भसीन, सरला कागलीवाल,निर्मला काळे,अरूणा धुमाळे यांनी केली आहे.