उद्यापासून रिंग रोड येथील नवनिर्माण कॉलोनीत पु शिवदत्त महाराज यांची भागवत कथा
अकोला- पितृ पक्षच्या पावन पर्वावर स्थानीय रिंग रोड, जानोरकर मंगल कार्यालय परिसरात नवनिर्माण कॉलोनी येथे भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ कथा प्रारंभ होत आहे.याभागवत कथेत पू. सुधांशुजी महाराज यांचे परम शिष्य, धर्माचार्य शिवदत्त महाराज भागवत कथा साकार करणार आहेत. सेवाभावी स्व. दिलीपसिंह ठाकुर यांच्या स्मृतीत श्रीमती वैशाली ठाकुर द्वारा आयोजित व विश्व जागृति मिशन अकोला शाखा यांच्या सहकार्याने उद्यापासून दिनांक 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत नित्य दुपारी 3 ते साय 6 वाजे पर्यंत रिंग रोडच्या नवनिर्माण कॉलोनीत ही भागवत कथा संपन्न होणार आहे. या उत्सवात दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता परिसरातील आनंद निकेतन सत्संग भवन येथून कथा स्थळ पर्यंत कलश यात्रा आयोजित करण्यात आली आहे.या कथेत दिनांक 22 सप्टेंबर रोजी भागवत महात्म , दि 23 सप्टेंबर रोजी शिव पार्वती विवाह,दि 24 सप्टेंबर रोजी वामन अवतार,बुधवार दि 25 सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमी, गुरुवार दि 26 सप्टेंबर रोजी गोवर्धन पूजा व छप्पन भोग दर्शन, शुक्रवार दि 27 सप्टेंबर रोजी रुकमणी विवाह, शनिवार दि 28 सप्टेंबर रोजी सुदामा चरित्र व कथा विराम होणार आहे. रविवार दि 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता हवन पूर्णाहुति होऊन दुपारी महाप्रसादाने या उत्सवाची समाप्ती होणार आहे. या भागवत कथेचा सर्व महिला पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती वैशाली ठाकुर, आशीष ठाकुर, सचिन ठाकुर, विश्व जागृति मिशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम वानखडे, महामंत्री विश्वजीत सिसोदिया, सचिन ठाकुर आदीनी केले.