रोबोट करत आहेत गणेशाची पूजा विधि व प्रसाद वितरण
Robots are worshiping Lord Ganesha
अकोला : रोबोटिक्स तंत्रज्ञान व प्रशिक्षनात महानगराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची महान कामगिरी करणाऱ्या रोबोटिक्स एक्सपर्ट काजल राजवैद्य यांच्या जुन्या इन्कम टॅक्स चौक गौरक्षण रोड परिसरातील के आय टी एस टेक्निकल लर्निंग केंद्रात 7 सप्टेंबर रोजी 11 वाजता श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून या केंद्रातील रोबोट हे गणेशाची पूजा विधि पार पाडीत (Robots are worshiping Lord Ganesha)असल्याचा अविस्मरणीय नजारा केंद्रात दिसून येत आहे गणेशोत्सवाच्या पर्वावर श्री गणेशाची विधिवत केंद्रात स्थापना करण्यात आली करण्यात येऊन केंद्रातील सर्व रोबोट श्री गणेशाची पूजा विधि मंत्रोपचार घंटा वाजवणे पुष्पा अर्पण करणे व प्रसाद वितरणाचे काम करीत असून हे बघावयास आता या केंद्रात गणेश भक्तांची गर्दी उसळली आहे
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील युट्युब लिंक ला क्लिक करा 👇
https://youtu.be/ZZi5TL6NAS4